Sunday, 18 December 2011

हे 'असं' कसं?

घट्ट विण
असलेली नातीही,
कधी ढिली पडतात...
कळवळतो, विव्हळतो जीव!

सतत शस्त्र खाली टाकून
'गरज' आहे, असं सांगण्याची
सवय आडवी येते!!
'आपलचं माणूस' आहे ना?
असा आवाज पुन्हा येतो...
मनाला समजावणं, की
भुलावणं?
वरच्यालाच ठाऊक....!

मग एक 'अस्फूटसं' हास्य,
मन हारल्याची आपली जाणिव...
अन्
जग जिंकल्याचा 'विजयी' भाव
त्याच्या चेहर्‍यावर.....

नाती अशी टिकतात का?
'एकाच्याच' गरजेखातर??
कळत नाही...
पण;

दरवेळी असंच घडतं खरं.......!!

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...