Friday, 2 March 2012

बीज अंकुरे अंकुरे

बीज अंकुरे अंकुरे
रुपं नव्हाळ मातीला,
गर्भारता देह तिचा
रंग केतकी कांतीला!

बीज अंकुरे अंकुरे
माझे स्वप्न तुझ्या डोळा,
सूर ल्याले रे तुझे मी
शब्द शब्द झाला खुळा...

बीज अंकुरे अंकुरे
जमिनीला लागे ध्यास,
वाढ वाढावे गं रोप
नको आभास आभास...

बीज अंकुरे अंकुरे
आता स्वप्नांना आकार,
उद्या उमलेल पातं
घरी बहार बहार..

बीज अंकुरे अंकुरे
म्हणे करा तपासणी,
जर देशी वंशा दिवा
आकाशास गवसणी!

बीज अंकुरे अंकुरे,
का हा वणवा पेटला?
नवा जन्म रुजताना
कुणी गळा गं घोटिला?

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...