उबेची पाखर...

मित्र- मैत्रिणींनो, जरासं मनोगत देतेय!
काही दिवसांपूर्वी, नॅशनल जियोग्राफीवर बाळाचा जन्म, अगदी बाळ एक आठवड्याचे असल्यापासून ते जन्मापर्यंतची संपुर्ण प्रोसेस दाखवली.. त्या गर्भातल्या बाळाच्या निर्मितीपासून ते जन्मापर्यंतचा प्रवास अदभूत वाटला.. हे पाहू शकतो, समजू शकतो आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे.. त्यानंतर सुचलेलं काही.. सांभाळून घ्या.. ही तुमची माझी कविता!
____________________________________________________________________________

उबेची पाखर...

नाळेपासून वेगळे होताच
सुरू होतो प्रवास,
दोन जीवांचा- एकाच दिशेने?
काही योजनेच..

नंतर माझा रस्ता वेगळा!
स्व सुखाच्या शोधात
अनायसे वृत्तींना चिकटत गेलेला-
स्वार्थ!

पण; सांगू
कधी माझं आभाळंच उणावतं,
तुझ्या गर्भातलं ऊबदार आयुष्य खुणावतं...
तिथे नव्हता जबाबदारीचा, कर्तव्याचा अंश
नव्हता समाज, परंपरा, अपेक्षांचा दंश..

भाबड्या कल्पना सार्‍या,
निसर्गचक्राने उलटं फिरावं..
त्या ऊबेला लपेटून, पुन्हा जगून घ्यावं!

-बागेश्री
२०/२/२०१२

Post a Comment

0 Comments