Sunday, 22 July 2012

माझ्या निसर्गास..

विषादाने मन ओतप्रोत भरलेलं
असताना, अंगावर येणारी झुळूक,
तुझं आस्त्तित्व जाणवून देणारी..

तुझं सुंदर हिरवंगार,
रूप पाहून
मळभाने दूर सरावंच!

निराशा झटकण्यासाठी,
नव्या जोमाने लढण्यासाठी,
चैतन्याला जिवंत ठेवण्यासाठी,
खरं तर-
जगण्याचंच बळ मिळवण्यासाठी,
पुन्हा तुझाच आधार,
तुझीच गरज...!
कधी कधी मग आपसूकच मिळतं उत्तर-
का तुझ्या इतकी जवळ आहे ते..

फक्त,
तू प्रलय घडवून आणू नकोस...!

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...