Sunday, 9 December 2012

पानगळ..

तुझ्या कुशीत
हळुवार शिरले,
अन्
सगळ्या 'विवंचनाच' गळून पडल्या!

'पानगळीचा' असाही अर्थ असावा का?

हलकं हलकं झालंय मन...

नवा उत्साह,
'जीवन सुंदरच आहे' ह्याची खात्री!!

जुनंच सगळं, पण जुळून आलंय, पुन्हा नव्याने!

निलगिरी आवडायला लागलीये,
चाफा वेडावतोय,
चंद्रावर नजर ठरत नाही
अन्
ओठांवरचं हसू लोपत नाही...!

फिरुन,
'तुझ्याच' प्रेमात पडण्याचा
अनुभवच वेगळा आणि ताजा......

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...