Saturday, 8 December 2012

रोजच मला वाटत असतं..!!

रोजच मला वाटत असतं
काल मी जरा लहान होते,
समंजसपणाच्या शिडीवरती
एक पायरी खाली होते!

रोजच मला वाटत असतं
उद्या असा असणार नाही,
कोरडे केलेत अश्रू सारे
आता डोळा रुसणार नाही!!

रोजच मला वाटत असतं
आज नेहमी, आज असतो
मळभ चिंतेचे उद्यावर- व्यथेचे कालवर
आज मात्र निरभ्र असतो...!

रोजच मला वाटत असतं..!!

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...