Saturday, 8 December 2012

कुपी उघडता.....!!

फांद्यांवरून सरसरणारे
नितळ थेंब अन् मातीत विरुन
जन्मणारा मृद्गंध....
त्याला श्वासात भरुन घेताना,
तुझ्या आठवणींवरची पकड अलगदच
ढिली होते,

कुपी उघडते...!

बाहेर पावसाच्या सरी अन् मनात
आठवणींचा झिम्मा...

हसर्‍या, गोड क्षणांसोबत
सारे केविलवाणे क्षणही जागे...
काही उसासे,
काही निश्वास!

मोकळ्या झालेल्या,
ह्या आठवणी गोळा करून
पुन्हा बंदिस्त करणंच अवघड!
पण;
कश्याही असल्या, तरीही
ह्यांच्या गंधापुढे
ओला मृद्गंधही,

फिकाच.....!!

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...