Thursday, 10 January 2013

मोह....

एखाद्या भावनेने उच्चांक गाठला,
की मेंदूवरची पकड सुटण्याचीच भिती जास्त!

ते क्षणच मोहक...
कधी आनंदाचे, कधी निराशेचे..

कधी हा मोह इतका लोभसवाणा की,
सारासार विचारांना तेव्हा सरळ बाजूला सारून आनंदाने त्यापुढे शरण जावं..

तर कधी,
काळवंडलेली उदासीनता व्यापून उरते...
तिचा गडदपणा घेरून टाकतो,
अशा वेळी त्यातून बाहेर पडण्याची उसनी धडपडही न करण्याचा मोह!!

फक्त हा 'मोह' आपल्यापासून वेगळा होताना काहीतरी घेऊन जातो... काहीतरी खूप जपलेलं!

मग वाटतं,
असे मोहाचे क्षण टोलवता आले पाहीजेत..

म्हणजे त्यांचा आपल्याला स्पर्श तर होईल
पण परिणाम नाही....!

 -बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...