Wednesday, 26 February 2014

मै और मेरी आवारगी....!!

एखाद्या गाण्याणं वेड लावणं अनेकदा झालंय...
..पण "मै और मेरी आवारगी"
ह्या गाण्याचं गारूड मन, कान, चैतन्य व्यापून उरलंय...

आपल्यातल्याच आवारगीचा हात घट्ट घट्ट धरून जग भटकून यावं!
आपल्यासोबत घडलेलं बरं-वाईट, घडू शकणारं बरं-वाईट सगळ्या सगळ्याला सोबत असावी, ह्या आवारपणाची...

खूप दुखावलंय? स्वतःच्या सहनशीलतेचं कौतुक वाटतंय? एक-एक करून जोडलेलं सारं काही आपल्याच हातांनी बेचिराख करावं लागतंय...?

कर! आवारगीला हाताशी घेऊन...

ये दिलही था जो सेह गया
वो बात ऐसी कह गया,
कहनेको अब क्या रह गया
अशकोंका दरिया बह गया...
जब कह के वो दिलबर गया
तेरे लिए मै मर गया,
रोते है उसको रातभर,
मै और मेरी आवारगी.......

सगळंच नाही होत मनासारखं...
आपण अखंड असतो, तेव्हा स्वतःचं रूप आपल्यात निरखायला सारेच येऊ पाहतात.. डोकावतात, नखशिखांत स्वतःला पाहतात, आपल्यात.... !
मनमुराद पाहून होतं, कधी तार जुळते, कधी बिनसतेच, आपल्यात स्वतःला निरखून पाहणारा पुढे निघतो... त्याच्या नसण्याचा दगड आपल्यावर भिरकावत..
खळ्ळ!
लक्ष लक्ष तुकडे घेऊन आपल्या शरीराच्या चौकोनात आपण कसे-बसे उभे!
तुकड्यांमध्ये आता स्वतःला निरखायला कोण येईल?
जगाला अखंडपणा प्रिय.. तुकडे नाहीतच.

हम भी कभी आबाद थे
ऐसे कहा बर्बाद थे
बेफीक्र थे, आज़ाद थे
मसरुर थे, दिलशाद थे..
वो चाल ऐसी चल गया
हम बुज़ गए, दिल जल गया
निकले जलाकर अपना घर..
मै और मेरी आवारगी....

पुन्हा आवरगी..... बस आवारगी..
छोड साला म्हणत, तुकड्यांचा जल्लोष साजरा करायला निघालेली....

एक दुसरे के, हमसफर,
मै और मेरी आवारगी....!!

-बागेश्री

(किशोरदा _/\_)

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...