Saturday, 22 March 2014

अदमास

मन घेतलंय स्वच्छ सारवून
त्यावर बोटांची नक्षी आलीय उमटून...
कळकट आठवणींच्या गोवर्‍या, थापल्यात
निबर भावनांवर!
मनभिंतींवरचा गेरुही फिकूटलाय
सरत्या सुखासारखाच        
अशी सगळी तयारी, म्हणजे
दु:खं वाजत गाजत येतच असतील.....
- बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...