Thursday, 15 May 2014

तुज आठवते का काही...

तुज आठवते का काही
मन गंध फूल झालेले
अन उनाड माळावरती
एक नाते उलगडलेले
तुज आठवते का काही....
 
कधि शब्द शब्द गाताना
मज सरगम उमगत जाते
मी तुझ्यात हरवत जाता
डोळ्यांचे गाणे होते...
तुज आठवते का काही...
 
मी सुन्न सुन्न असताना
तव भास अनाहुत जगतो,
हे तुलाच सांगत जाता
हलके हलके मोहरतो
तुज आठवते का काही...
 
ही साथ अशी लाभावी 
एक जन्म कैकदा घ्यावा
मी यावे परतून पुन्हा
ह्या आठवणींच्या गावा   
तुज आठवते का काही....

-बागेश्री 
 
 

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...