कोलाज

जगण्यातले सारे संदर्भ हलके होत उडतात
अवकाशात उभे राहतात,
कोलाज करून!

चित्र साकारतं, सुबक चौकटीत
त्यातले चेहरे मात्र अपूर्ण!
आकारही अनोळखी..
चारही कोपरे व्यापून अर्थहीन!

वरवर परिपूर्ण वाटणारं आयुष्याचं चित्र
आतून विसंगत संदर्भांच असल्यावर
जगण्याची सुशोभनीय चौकट पुरेल कुठवर!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments