Friday, 26 September 2014

उशी

शेवटच्या निरोपी
तू दिलेला मोग-याचा गजरा
नकळत माळला
मी घरी येऊन
आणि जाणवलं
आज अस्वस्थ होईल,
वळसे घेईल रात्र
ह्या कुशीवरून त्या कुशीवर
जगण्याचा सुगंध पसरेल
श्वासा श्वासांतूनअंगभर..

सकाळी मोगरा कोमेजलेला असेल
जगाला मात्र काहीच कळणार नाही..
फ़ुलांवर कुणाचंच नाव नसतं
काळजावरचं दिसत नसतं!

सगळं आलबेल.

माझी उशी होता आली तर बघ कधी
तिच्याकडे माझी सगळी गुपितं आहेत..
काही कोरड्या डागांची..
काही ओलसर ताजी

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...