उद्रेक

आपल्या
असण्या- नसण्यावर,
भूतकाळातल्या क्षणांवर,
येऊ घातल्या भविष्यावर,
कुणी सर्वाथाने व्यापू पहातं
तेव्हा घूसमट होते!

धडपडतो जीव
मोकळा श्वास घेण्यासाठी!
ही धडपडही थोपवल्या जाते..
आणि येतोच घडून विनाशी
उद्रेक!
त्यात,
कुठलंतरी अस्तित्व, जातं जळून!
कुठलंतरी वाचतं, जातं तगून...

म्हणूनच,
जपावं स्वत:ला
नेस्तनाबूत झाल्यानंतर प्रत्येकालाच फिनीक्स होता येत नाही...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments