Wednesday, 17 December 2014

अडगळ

अंगावर तिरस्काराची धूळ दाटू लागते,
तुच्छेची जळमटं आकार घेऊ लागतात आणि
सुरु होते धडपड बाहेर पडण्याची!
जीवाच्या आकांताने दरवाजावर धडका मारल्या जातात...
प्रत्येक धड़केनिशी दार मात्र, घट्टच होत जातं!!

खरंच,
कुणाच्या मनातली अडगळीची जागा कधी मिळू नये!

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...