पायघडी

तो निघतो म्हटल्यावर तिला आठवलं, तिला त्याला फूलं द्यायची होती....!

तिने कधी ना कधी त्याच्यासाठी आणलेली
त्याने ठेऊन न घेता, कायम परत केलेली

घराच्या एका शांत कोप-यात,
माणूसभर उंचीच्या फुलदाणीत तिने राखली होती ती फूलं
खोट्या फुलांच्या तळाशी, उपेक्षित खरी फूलं!

तो निघतो म्हटल्यावर,
घाईने तिने फुलदाणी उपडी केली आणि त्याच्या समोर अंथरली गेली पायघडी!
रातराणी, गुलाब, कुंद, मोगरा...
त्यानेही पायघडीचा सन्मान केला

एक पर्व संपलंय..

खोट्या फुलांनाही सुगंध येऊ शकतो,
हे मात्र तिला त्याच्याच सानिध्यात समजलं....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments