Wednesday, 2 September 2015

वाजत होता सायरन

प्रत्येकालाच कुठे न कुठे पोहोचण्याची घाई
कुणाला ऑफिस, कुणाला घर 
कुणाला शाळा, कुणा दुसरे नगर....

एका जीवाच्या श्वासालाही लागली होती घरघर
वाजत होता सायरन... सारखा,
वाजत होता सायरन!

लाल दिव्यांनी रोखून धरली सारी गती,
तेव्हा, सारे क्षणैक थांबले अन्
गाड्यांच्या झुंडीत अडकला सायरन! 
तरी अखंड तो गर्जत होता
उडू पाहणार्‍या जीवाला थोपवून धरण्यासाठी
जीवापाड धडपडत होता.

आपला तात्पुरता मुक्काम गाठण्यासाठी 
जीवाचं रान करणार्‍या, स्वार्थी गर्दीला 
येईल का ऐकू,
सायरनखालची निर्वाणीची घरघर....?

-बागेश्री

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...