शिशुपाल

तू रुसला नाहीस ना कधीच?
तुला खोटा पैसा दाखवल्यावर,
गरमीच्या काहिलीने तुझ्या नावे बोटे मोडल्यावर?
तू वेळेत आला नाहीस तेव्हा तुला नावं ठेवल्यावर,
अती बरसून गावं वाहून नेल्याचा दोष दिल्यावर,
तू सिंचलेली झाडं कापल्यावर,
तुझ्या सखीने पोटात साठवलेलं पाणी उपसून काढल्यावर,
ओझोनचा थर फाडून टाकल्यावर?

तू येतोस
येत राहतोस
तिला भेटतोस
तुझ्याकडचं सारं देत रितं होत राहतोस
तुझ्या- तिच्या भेटीची ओढ कायम असेपर्यंत आम्ही सारे शिशुपाल.

-बागेश्री

Post a Comment

0 Comments