Saturday, 5 December 2015

आरसा

तुला मी आवडू लागले आहे
तुझी छबी वाटू लागले आहे
विचार केल्यावर कळतंय
तुझ्या 'मी' पणाचा लेप 'माझ्यातल्या तुझ्यावर' जास्त गर्द चढलाय..
तुझा पारा माझ्या अस्तित्वाला बिलगलाय.
मी आरसा झालेय.

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...