Monday, 21 December 2015

पुन्हा

पुन्हा तुझा निरोप घेणं
पुन्हा मुखवटा ओढून घेणं
जगात नकळत मिसळून जाणं
पुन्हा द्वंद्व ख-या खोट्याचं
अवसान आणून जगत जाण्याचं
श्वासांमधून उसासे गोवण्याचं
 
पुन्हा नजर शिथिल शांत
पुन्हा मनाची अवस्था क्लां
वास्तव स्विकारण्याची भ्रांत
पुन्हा सगळं उसवून बसायचं
गुंतल्या पाशांना मोकळं करायचं
नव्याने नशीब विणायला घ्यायचं
-बागेश्री

4 comments: