Thursday, 28 January 2016

धुकं

एखाद्याच्या अदृश्य कसोटीवर
आपल्या भावना तासल्या जातात
सतत,
खात्री पटेस्तोवर!
खात्री पटल्यानंतरच
हात पुढे सरसावतो
जवळ करू पाहतो

अशा हाती आपण केवळ धुके होऊन येतो

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...