चराचर

तू शुभ्र चांदण्याच्या देशात आहेस
की लूकलूक कवडश्यात?
प्राजक्ताच्या केशरी देठात
की रंगीत तावदानात?

धुक्यातला स्वच्छ किरण आहेस
की थंडीतलं उनउन ऊन?
कस्तुरीच्या धुंद गंधात
की जुन्या वस्तूच्या ट्रंकेत?

पालवीचा पहिला कोंब आहेस
की सावरून बसलेला दवबिंदू?
देठाच्या मुळाशी
की माझ्या नाळेशी?

कशी घ्यायची भेट तुझी
उराउरी?
नसूनही भासतोस कसा,
चराचरी?

-बागेश्री

Post a Comment

2 Comments

  1. खुप छान कवितांचा संग्रह मिळाला ब्लॉग च्या रूपाने
    Thank you...
    blog view web version kara all content diste... open kela ki

    ReplyDelete