परिमाण

सर: हे काय आहे?


अ: वॉव किती सुंदर आहे हे झाड!
ब: किती मोठं झाड आहे हे
क: केवढी मोठी सावली देणारं झाड
ड: पक्षांची घरटी असलेलं झाड
इ: खोल मुळं असलेलं झाड
फ: फार जूनं झाड
क: डेरेदार झाड
ख: उंच झाड
ग: हे झाड आहे.


सरांनी "ग" कडे अत्यानंदाने पाहिलं.
'ग' ची दृष्टी नितळ आहे, जी घटना आणि गोष्टी बघते. स्वीकारते. आहे तशा. त्याला स्वतःची परिमाणे लावत नाही.


-बागेश्री

Post a Comment

0 Comments