Tuesday, 5 April 2016

स्वप्न

मी शब्दांच्या बिछायातीवर निजते तेव्हा
तू आशयाचं पांघरून अलवार घालतोस
अर्थाची उब थोपटू लागते आणि
मी सिद्ध होते,
तुझ्या कवितांच्या प्रदेशात शिरायला....

-बागेश्री

No comments:

Post a Comment

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...