Thursday, 14 April 2016

ओंजळ

चांदणी ओंजळीत आली आणि
मला आकाश असल्यासारखं वाटलं...
वाटलं की
इथून तिथेपर्यंत मीच व्यापून आहे...
मीच भरून येणार
मीच रिती होणार
अंगभर रुळणा-या
चांदणीचं कौतुक करायला
वेळ पुरायचा नाही
माझं आकाश होणं
दिवसभर सरायचं नाही..

पण
शेवटी आकाशच ते! फसवं..

माझी ओंजळ आणि त्याची पोकळी, सारखीच...!

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...