Wednesday, 25 May 2016

ओढ

"जरा हात पुढे कर
हा इतका शब्द ठेवून घे...
ह्या शब्दाच्या संवेदनेची थरथर,
तुला जाणवत राहील
तोवर सारं आलबेल..."

त्याला काही कळण्याआधी,
ती गेलीही!
...त्याने अलवार मूठ उघडली
तिला हाताळतो
तितक्याच हळुवारपणे
शब्द हाताळला
शुन्यात नजर गुंफत
तोच शब्द मनाशी आळवत राहिला
         "ओढ"

तिच्या ओढीची
अनामिक लहर
त्याच्या सर्वांगातून
वाहत राहिली

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...