Wednesday, 1 June 2016

सार्थक पावसाचं

तू नाजूकपणे
दुस-याही डोळ्यात काजळाची रेघ ओढलीस..
दोन्ही डोळे सवयीने मिचकावलेस
स्वतःच्याच डोळ्यात पहात
मोहक हसलीस....

असं तुझं धीट रूप
त्या अर्धमिटल्या तावदानातून पाहिलं,  वाटलं..

हुश्श!

महासागरांवरुन,
कमीदाबाचा- जास्तदाबाचा पट्टा
हे गणित जुळवत, सांभाळत
ह्या वर्षी मी,
कसल्या योग्यवेळी येऊन थडकलोय..
खरं सांगतो,

प्रवासाचा शीण पार निघून गेला

-बागेश्री

No comments:

Post a Comment

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...