पत्ता


Post a Comment

3 Comments

  1. पत्ता....हे एक स्थळ सापेक्ष असं मनाच आयाम,dimension आहे..तसचं ते वास्तवाचंही आहे...पण मन ही वास्तविकता नाही, तरीही तिला अस्तित्वाची केवळ जाणीव आहे...वास्तवतेचे भान आहे, पण वास्तवात सदैव राहण्याचे बंधन नाही...मन हे आपल्या जगण्याचे असे आयाम आहे, जिथे पूर्ण आणि संपूर्ण स्वातंत्र्य आहे.कारण त्याला कृतीचे बंधन नाही."मनाप्रमाणे जगायचे... किती किती छान बेत होते..." असं म्हणून मनाला समजावे लागतेच ना !"तुझ्या मनातील "सा-या खुणाही तशाच होत्या" तरीही "मग दार का कुणी उघडत नाही" ह्या तुझ्या प्रश्नाच उत्तर तूच दिले आहेस " घराने ओळख दिली नाही की... अवस्था सैरभैर होतेच" बागेश्री, ह्या ओळख न देणा-या घरातच एक सोपान आहे, तुझ्या उत्क्रांत होणा-या मनाचा.रिल्के म्हणतो, सत्य हे एक दर्शन आहे....त्याच्या दृष्टीला ते दुख: म्हणून भेटते...तुला मात्र सत्य भेटूनही ओळख देत नाहीयेय...आणि जी सैरभैर अवस्था होत आहे...तो आहे एक सोपान....मुक्काम नाही...तुला इथे आसरा घ्यायचा नाहीयेय..विश्राम पण नाहीयेय..एक खुण आहे...एक पायरी आहे..तू सैरभैर झालीस तरीही.... रिल्के म्हणतो, "उत्क्रांतीच्या मार्गावर प्रत्येक पाऊल ...अखेरच्या पावला इतकं सुखद,रम्य व अंतिम असत"...रिल्के प्रत्येक पाऊलात अंतिम सुख पाहतो...आपल्या संस्कृतीने मात्र जीवन हा एक अखंडत्वाचा वसा घेतलेला प्रवास म्हणल आहे...कारण अंतिम हे अनंत आहे....

    ReplyDelete