Monday, 6 June 2016

मृदगंध

तू अतीव मायेने
चेह-यावरून हात फिरवलास
माझा कोरडा श्वास, तुझ्या हातावर पडला
तुझी प्रेमळ नजर पाहत राहिली मला, आरपार
अन् दूरपर्यंत तुला फक्त दुष्काळ दिसला...!

तू कुशीत घेतलंस मला,
करत राहिलीस माया
माझ्या रंध्रांतून वाफा उठत राहिल्या
तू थोपटत राहिलीस...

थोपटत राहिलीस
आणि स्वतःच निजलीस, आई!
मी न्याहाळत होते तुला
आणि
जाणवलं मला की
कित्येक वाळवंटे ओलांडून तू
उभी आहेस
तरीही शांत आहेस
पूर्ण आहेस!
बघता बघता
डोळे भरून आले
अन्
गालांवचा मृदगंध हवेत विरत राहिला!

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...