Saturday, 20 August 2016

'A journey to the Heart'

कॉलेजमध्ये असताना, इलेक्ट्रॉनिक्सच्या अभ्यासात एक अप्रतिम कॉन्सेप्ट होता. इलेक्ट्रॉन त्याच्या केंद्रापासून दूर विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतो.
अशा अनेक कक्षा असतात. 
केंद्राच्या अगदी जवळची कक्षा आतली कक्षा. बाहेरच्या मोठ्या होत जातात. हे इलेक्ट्रॉन बाहेरच्या उच्च कक्षेतून आतल्या लहान कक्षेत उतरतात, उडी मारतात त्यावेळी काही पॅकेट्स बाहेर टाकतात. 
इलेक्ट्रॉनच्या ह्या कवायतीमुळे एनर्जी/ लाईट निर्माण होतो.

आज ओशो ऐकत घरी येत होते..
विषय होता 'A journey to the Heart'
ओशो म्हणतात, तुम्ही बुद्धीच्या कक्षेतून मनाच्या कक्षेत उतरता, उडी मारता तेव्हाच खरं जगणं सुरु होतं
हा "fall" आहे, असे ते म्हणतात. 
खरंय, बुद्धधीच्या व्यावहारिक उंचीवरून मनाच्या संवेदनशीलतेकडे उतरणं म्हणजे जगाच्या दृष्टीने अधोगतीच, फॉलच..!
ह्यावर अधिक विचार करताना वाटलं
बुद्धधीकडून मनाकडे उडी मारताना जे पॅकेट आपण आपल्याबाहेर फेकतो ते इतर काही नसून 'इगो' असावा, कारण एकदा तो बाहेर पडला की मग फक्त प्रकाश उरतो, सकारात्मक एनर्जी आयुष्य व्यापू पाहते
हा असा वरवर दिसणारा 'फॉल' आपल्याला आपल्या केंद्राकडे, आपल्या ख-या अस्तित्वाकडे घेऊन जातो, हे 'अहंविरहित आत्मकेंद्र' गाठण्याचं गमक कळलं की ह्या फॉलमधली रंगत दुणावते.

-बागेश्री

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...