'A journey to the Heart'

कॉलेजमध्ये असताना, इलेक्ट्रॉनिक्सच्या अभ्यासात एक अप्रतिम कॉन्सेप्ट होता. इलेक्ट्रॉन त्याच्या केंद्रापासून दूर विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतो.
अशा अनेक कक्षा असतात. 
केंद्राच्या अगदी जवळची कक्षा आतली कक्षा. बाहेरच्या मोठ्या होत जातात. हे इलेक्ट्रॉन बाहेरच्या उच्च कक्षेतून आतल्या लहान कक्षेत उतरतात, उडी मारतात त्यावेळी काही पॅकेट्स बाहेर टाकतात. 
इलेक्ट्रॉनच्या ह्या कवायतीमुळे एनर्जी/ लाईट निर्माण होतो.

आज ओशो ऐकत घरी येत होते..
विषय होता 'A journey to the Heart'
ओशो म्हणतात, तुम्ही बुद्धीच्या कक्षेतून मनाच्या कक्षेत उतरता, उडी मारता तेव्हाच खरं जगणं सुरु होतं
हा "fall" आहे, असे ते म्हणतात. 
खरंय, बुद्धधीच्या व्यावहारिक उंचीवरून मनाच्या संवेदनशीलतेकडे उतरणं म्हणजे जगाच्या दृष्टीने अधोगतीच, फॉलच..!
ह्यावर अधिक विचार करताना वाटलं
बुद्धधीकडून मनाकडे उडी मारताना जे पॅकेट आपण आपल्याबाहेर फेकतो ते इतर काही नसून 'इगो' असावा, कारण एकदा तो बाहेर पडला की मग फक्त प्रकाश उरतो, सकारात्मक एनर्जी आयुष्य व्यापू पाहते
हा असा वरवर दिसणारा 'फॉल' आपल्याला आपल्या केंद्राकडे, आपल्या ख-या अस्तित्वाकडे घेऊन जातो, हे 'अहंविरहित आत्मकेंद्र' गाठण्याचं गमक कळलं की ह्या फॉलमधली रंगत दुणावते.

-बागेश्री

Post a Comment

2 Comments

  1. बागेश्री, ज्याला तू सोपान म्हणले आहेस, आठवत? त्या ह्याच electrons च्या कक्षा आहेत....ह्या विषयावर अधिक सविस्तर F Capra च्या Tao of physics ह्या ग्रंथात आहे..ते मी प्रसादला दिले आहे;ते तू जरूर वाच.ह्या ग्रंथावर काही पोस्ट्स माझ्या Time line वर आहेतच....ओशो पेक्षा अधिक स्पष्ट आणि वैज्ञानिक... पण आध्यात्माच्या अंगाने Quantum jump ही संकल्पना आणि electrons आणि sub-particles च्या संदर्भासहित Tao of Physics मध्ये अत्यंत स्पष्ट-नि:संदिग्ध आहे.

    ReplyDelete
  2. Quantum jump>> This concept attracts me the most. Nakki vachate

    ReplyDelete