आसक्ती

एखादी आसक्ती
आयुष्यभर नाचवते
बरेचदा तिच्यापोटीच
व्यवहार घडतात
तत्वापासून स्वत्वापर्यंत
मग सगळंच सुटत जातं
स्वार्थ अपेक्षांपासून
स्वतःवरच्या हक्कापर्यंत
आणि
अस्तित्व पोकळ होतं..

...  शेवटी रिकाम्या घरात
आसक्तीही नांदत नाही

-बागेश्री

Post a Comment

0 Comments