Tuesday, 18 October 2016

निस्वार्थ

शोधत राहतोस स्वार्थाचा एखादा ठिपका
माझ्या आत
डोळ्यातून आत्म्यापर्यंत
दरवेळी रिकाम्या हाताने
परतूनही
पुन्हा उर्मी असते
तुला खात्री आहे
शोध व्यर्थ नसल्याची
कधी माझ्या अस्तित्वाच्या काठाला
टेकून बस
शोधाची आदिम इच्छा त्यागून
तुझा भवताल
सुखद निस्वार्थाने व्यापून जाईल
-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...