Monday, 5 December 2016

अस्तित्वाचा कापूस

आभाळाने साद घातल्यासारखं
काळीज ओढ घेतं
आणि वाटू लागतं
देहाची चौकट मोडून
चैतन्य जाईल उडून
कुठल्याही क्षणी..
मागे उरेल
फक्त अस्तित्वाचा कापूस
इतरांकरता
पिंजण्यापुरता

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...