Monday, 16 January 2017

एकांत

एकांताला असतात हजार प्रश्न पडलेले
पण एकांताला नसतो
कुठलाही आवाज
ते प्रश्न घेऊन तो उभा राहतो आणि
पाहतो डोकावून
मेंदूच्या आडून
थेट वास्तवात
न विचारताही मिळतील का काही उत्तरे
करतो तोडका- मोडका प्रयत्न
वास्तवाइतकं परखड काही नाही
वास्तवासारखं पारदर्शी कुणी नाही
मेंदूतून पार होत
उत्तरं मिळत जातात त्याला
नजरेत हळू- हळू धुकं दाटतं
आणि एकांत शिरत जातो
एकतांच्या कुशीत....

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...