ऋतू

....खूप ऊन पडलं
करपून जायला झालं
मग ऋतू बदलला
हवा पालटली
गारवा पडू लागला
ढग जमू लागले
गाणं गाऊ लागले
मग चिंब भिजवणारा पाऊस आला
अंगा खांद्यावर
नाजूक नाजूक
हिरवी नक्षी चितारून गेला
बहरून मोहरून गेला
काही दिवस आनंदोत्सव
साजरा झाला
मग हळू हळू
तापू लागलं
खूप ऊन पडलं
करपून जायला झालं....

मला कळलंच नाही
ऊन का
मला कळलंच नाही
पाऊस तरी का

मीही झाड होऊन उभीच राहिले
तूही ऋतूंची मनमानी सोडली नाहीस

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. मी एक झाड,संवेदनशील साक्षीदार निसर्गाचा.बागेश्री म्हणते," मला कळलेच नाही.." साक्षीदार फक्त टिपत असतो ' ब्लॉटिंग पेपर ' सारखा..त्याला बुद्धिवादाची गुंतागुंत नसते..त्याला असतं, एक संवेदनशील मन..


    ReplyDelete