Tuesday, 6 February 2018

तुला जायचं असेल तर...

तुला जायचं असेलच तर समूळ निघून जा अंगा खांद्यावर, नव्या पालवीवर वाळल्या फांदीवर कुठलीही खूण न ठेवता जा.. सावरून घे, किना-याची लाट लपालपता फेस धडाडते उर भूरभुरले केस.. काठाशी आलेली, शिंपली घेऊन जा हाताशी आलेली गुपितं घेऊन जा.. घेऊन जा प्रत्येक आठवण मंतरलेले कित्येक क्षण पुसट पुसट पाऊलखुणा ने ओंजळीतलं पाऊसपाणी ने लपेटलेली रात्र ने उसवलेली गात्र ने डोळ्यांतलं पाणी, आठवणीतली गाणी उनाड गप्पा भीतीचा धप्पा घेऊन जा ती संध्याकाळ ती हुरहुर नुसत्या चाहुलीने पेटणारे काहूर सारं सारं बांधून घे तुझ्यासोबती सारं ने... जायचंच असेल तर असा जा पाटी कोरी करून जा -बागेश्री
13 Nov 2017

No comments:

Post a Comment

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...