Silence!

मी करून पाहिला आक्रोश
बोलून दाखवल्या अपेक्षा, गरजा
मला वाटलं कान आहेत
माझ्या भोवताल
पोकळ..
ज्यातून जातील शब्द आत
फुटेल संवेदनांना
पाझर...
पण
माझ्याच अंगावर कोसळला माझा आक्रोश
दगडांना भिडून....
मी ही घेतलं, स्वतःला मिटून

समजावलं स्वतःला
माझ्याभोवती झाडे आहेत
गार- हिरवी, डेरेदार
लाखो करोडो
झाडांचे जंगल
खूप उद्विग्न असता
मी बसते एखाद्या झाडाखाली शांत.
बोलणार काय त्याच्याशी, म्हणून
राहते बसून निवांत.

आता माझ्यातला मूकपणा
गहिरा होतोय,
अस्तित्वाला शांततेचं
दाट अस्तर देतोय..
जंगल होऊन उरलेल्या
झाडांचे आभार...

-बागेश्री







Post a Comment

0 Comments