कूस

तुला कुशीत घेण्यासाठी हात पुढे केले,
त्या भरल्या डोळ्यांतली असहाय्यता
पाण्यासोबत हलके पुसली
तेव्हा, किती मधाळ हसलीस!
ते म्हणाले-
ही पहिल्यांदा अशी हसलीय
तुला माहिती नव्हतं म्हणे, जगणं म्हणजे काय...
कसे माहिती असणार गं,
केवढी चिमूरडी तू!
पण भूक माणसाला अवेळी मोठं करते बाळा

तशीच मोठाली इवलीशी तू
माझ्या कुशीत आलीस
आणि माझी कूस मात्र मोठी
फार मोठी झाली!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments