मौन

मौनाच्या जंगलात
झाडे मौनाची
फुले मौनाची
मौनाच्या तळ्याला,
चवही मौनाची..
उडालाच जर 
एखादा चुकार पक्षी
फडफड करत तर
शांततेवर उमटणारा 
ओरखडाही, मौनाचाच!

पायवाटा कवडसे
विझली पालवी
फुलल्या वेली
उगवतीला मावळतीला
ह्याला त्याला प्रत्येकाला
मौन डसलेले
कडकडून
ग्रासलेले..!

दोन माणसांत मौनाचे
हे असे जंगल पसरते तेव्हा
आशेला हळू हळू लागणारी 
वाळवीही, मौनाचीच!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments