एक क्षण

एक भेट म्हणून,
तू 'तो क्षण' दिलास....

त्या क्षणासाठीच तर
'जगण्याचा' खेळ मांडला होता!

मी 'तो' टिपला,
आसूसून जगण्याच्या
धुंदीत,
ओठांवरुन घरंगळला
अलगद मातीत विसावला!

शेवटी क्षणच तो..
संपला क्षणात!

दैव-दुर्दैव हेच काय ते,
की नंतर वाटाच वेगळ्या
तुझ्या नि माझ्या!
पण;
त्या क्षणाची आठवण, 'ताजी'
तशीच्च!

अनावर झालं, अन् त्या ठिकाणी
गेलेच पुन्हा!!

क्षणाचं रोपटं झालंय तिथे- गोंडस!
निघवेना रे तिथून...
मग अलवार उपटून हाती घेतलं ते, मुळांसकट!

तुझ्या अंगणापेक्षा उत्तम जागा कुठली त्याला?
आणून लावलंय तिथेच......!
कधी तुझी गंधभारली नजर पडलीच त्यावर
तर डोळे टिपशील ना?
निदान त्या रोपट्याला तरी,
तू
'तुझं' म्हणशील ना?

Post a Comment

0 Comments