सख्य

बरेचदा अनोळखी  चेह-यावरले
"डोळे" ओळखीचे वाटतात
पहिल्यांदा भेटलो तरी
जुनी ओळख सांगतात..
जणू त्या डोळ्यांना असतो ठाऊक
आपला सारा प्रवास
आपण करत राहतो कयास
हे कसं शक्यय?
अपरिचिताशी आपलं,
हे कुठलं सख्यय?

विसरतो, 'आपण' क्षणभंगूर तरी
आत्मा चिरंतन आहे
अनेक शरीरं ओलांडत त्याचा
प्रवास सुरु आहे..
युगानुयुगाच्या या
प्रवासातच कधीतरी
कुणीतरी
भेटला असेल, कुठेतरी..
डोळे म्हणजे आत्म्याचं
करकरीत स्वच्छ बिंब
जुनी ओळख पटून
उमटते प्रतिबिंब..
आपण मात्र उगाच
करत बसतो कयास
हे कसं शक्यय..?
अपरिचिताशी आपलं
हे कुठलं सख्यय?
-बागेश्री

Post a Comment

0 Comments