हुरहूर...

अनिमिष डोळ्यांत, स्वप्नांची गर्दी...
इतकी दाटी की,
एक स्वप्न गेलं
घरंगळून...
नकळत पार गालांच्या पलीकडे,
वस्त्रात जिरून..!
त्या थेंबाचा डाग मात्र
राहिला टिकून
वस्त्र जीर्ण झालं, विरलं
डागाचं असणं राखून...!
वर्षागणिक तो डाग मुरतोच आहे,
अस्तित्त्व घट्ट करतोच आहे..
तो जातही नाही-
साकारलेल्या स्वप्नाची ती खूणही नाही..
वाटतं मग,
ती केवळ 'हुरहूर' होती,
खूप दाटून आलेली
घरंगळून गेलेली
क्षणापूरती दिसून
कायमची टिकून राहिलेली....
-बागेश्री

Post a Comment

0 Comments