सूर्य

मी पाहिलाय नितळ सूर्यकिरण,
तुझ्या डोळ्यातून माझ्याकडे झेपावलेला..

नात्याताले अडेनिडे वेढे, बाजूला सारून
थेट चकाकलेला!

माझ्यातल्या आरश्यावर पडून
तुझ्यावरच परावर्तित झालेला
क्षणभर तूलाही उजळवून गेलेला!

तुझ्या अस्तित्वाच्या गस्तीतून
सुटलाच कसा तो, असं वाटून सैरभैर झाली होतीस!

निकराने पुन्हा ओतलं होतंस मळभ आपल्यात
घेतलं होतंस अंधारून...

मलाही फिरावं लागलं परतून
ठाऊक नाही,
सूर्याला झाकून ठेवण्याचा अट्टहास तुला कुठवर पुरणार आहे

Post a Comment

0 Comments