निर्लेप

मनातल्या मनात आपण स्वत:ला कुणालातरी देऊन टाकलेलं बरं असतं..
मग निर्लेपपणे जग बघता येतं
कशात न अडकता!

दृष्टी फार मोकळी, फार स्वच्छ होते
आपन बेफिकीर झाल्याने,
जगाकडे सोवळ्या नजरेनं बघायचंच थांबतं..

आपली सुख, दू:खे, किल्मिषे काहीच आपल्या सोबत नाहीत...
स्वच्छ पट!
नव्या कोर्या व्याख्या,
रोजच्या रोज!
आज जमा केलेलं, काही वजा झालेलं
सारे हिशोब त्याच्याच स्वाधीन..
आपली जबाबदारी नाहीच!

मग कधी फार हलकं, रिकामं वाटल्यावर
विचार येतो...
आपल्याकडे नाही का कुणी स्वत:ला सोपवलंय?
असं पूर्णपणे...

बहूतेक ही निर्लेपता देण्याची दानत कमवायचीच राहून गेलीय!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments