आजा फिरसे जीले यार

हो चल!
दिलं दुःख... घेतलंही दुःख
झाली ना मग परतफेड..

ये नव्याने डाव मांडू
उतू जाऊ दे,
सुख दे सांडू!

नकोच हिशेब
योग्य अयोग्याचे
आणि नकोत ब्लेम गेम
बदलणाऱ्या परिस्थितीशी
ये जुळवून घेऊ
सेम टू सेम!

जमेल का
उतरवून चष्मा
एकमेकांकडे पहायला?
दिसेल ब्लर आणिक
नाही जमणार
चुका शोधायला!
मागशील ना मग आपोआप
हात तूही धरायला?
ये!
नव्याने डाव मांडू
होईल सोपे जगायला!

किती काळजी
चिंता किती..
सरे जगणे
न येता भरती!
ये ज़रा
जगून घेऊ
भरून येऊ,
फुलून जाऊ!
बाल होऊ
तरुण होऊ
बॅड पॅचमधून
तरुन जाऊ..

टेंशन को तू गोली मार
आजा फिरसे जीले यार!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments