Thursday, 13 August 2015

आवाहन


जमिनीच्या भूर्जपत्रावर
झाडांच्या लेखणीतून,
आकाशाच्या कोर्‍या पाटीवर
भरजरी किरणांतून...

उग्र थंडीत
गारठल्या बोटांतून,
भर उन्हात
कोवळ्या झुळूकांतून,

रखरखत्या भुईच्या
भेगा भेगांतून,
गच्च दाटल्या
काळ्या मेघांतून..

तू उमल,
तू बहर...

आकाशगंगेला कवेत घे,
नात्यांना उशाशी..

कधी रणरागिणी
कधी प्रेयसी,
कधी बंडखोर
कधी श्रेयसी..

ये,
हर रूपात साकार हो...
हे कविते,
अलिंगन दे!

-बागेश्री
डिसेंबर 2013

No comments:

Post a Comment