तिने त्याला चुकवून रात्रभर त्याचा सदरा, रंगीत पाण्यात बुडवून ठेवला.
सकाळी पाण्याबाहेर काढल्यावर, तो तसाच शुभ्र, कुठलीही रंगछटा ना ल्यालेला.
तो हसला. ओठाच्या कोप-यातला जोडदात लक्ककन चमकला. म्हणाला, " सांगितलं होतं ना तुला, मी सगळ्या रंगात वावरतो, पण निर्लेप आहे"
त्याच्या चेह-यावर राग, द्वेष, अहं काहीही नसतं. मानवी कुतुहूलाची गंमत मात्र वाटते त्याला.
-बागेश्री
1 Comments
कित्ती छान !
ReplyDelete