देहाचे अस्तर

देहाच्या अस्तराखाली
दडली नाजूक राधा
ना कधी जडावी
तिजला, विश्वाची
व्यवहार बाधा
ती शोधीत कान्हा जाते
तो लागत हाती नाही
गोकुळात घुंगूर वेडे
पैंजण दुमदूमते राही

ती परतून जेव्हा येते
घेते मी तिला मिठीत
थकलेल्या त्या जीवाला
मग बांधून अस्तरात
देहाच्या अस्तराखाली
ती दडून बसते राधा...
सोडवू कशी मी तिजला
हो जडली श्यामलबाधा..!

- बागेश्री

Post a Comment

0 Comments