निरभ्र

नात्यावर मळभाचा
एखादा जरी 
ढग
रेंगाळू लागला, तरी
अंधारून येतं!
अशावेळी
बरसू द्यावं
डोळ्यांमधलं दाटलेलं आभाळ...
धरणीनेही
घ्यावं झेलून
मनामधलं साठलेलं आभाळ...

निवळल्यावर आपसूकच
सूर्याची मऊ किरणं
निरभ्र नात्याच्या 
अंगाखाद्यावर बागडू लागतात..
-बागेश्री

Post a Comment

0 Comments